पीएमपी ‘गॅस’वर; सीएनजीपुरवठा बंद करण्याचा एमएनजीएलचा इशारा

पीएमपी ‘गॅस’वर; सीएनजीपुरवठा बंद करण्याचा एमएनजीएलचा इशारा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पीएमपीने सीएनजी बिलापोटी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे (एमएनजीएल) 62 कोटी रुपये थकविले आहेत. त्यामुळे 14 जूनपासून सीएनजीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. एमएनजीएलकडून पीएमपीसह पुणे महापालिका प्रशासनालाही हा इशारा देण्यात आला आहे.

पीएमपीच्या ताफ्यात सीएनजीवर चालणार्‍या स्वत:च्या आणि भाड्याच्या मिळून अशा तब्बल 1 हजार 658 बस आहेत. या बसना एमएनजीएलकडून गॅसपुरवठा केला जातो. मात्र, या सीएनजी गॅसपोटीच्या बिलाची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीने थकवली आहे. त्यामुळे हा थकबाकीचा आकडा तब्बल 62 कोटी 12 लाखांवर गेला आहे.

ही थकीत रक्कम मिळावी, यासाठी एमएनजीएलने एकदा-दोनदा नव्हे, तर जवळपास 15 वेळा पीएमपी प्रशासनाला पत्रे पाठवली आहेत. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने अखेर एमएनजीएलने येत्या 13 जूनला मध्यरात्रीपासून सीएनजी गॅसपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत पीएमपीचे व्यवस्थापकिय अध्यक्ष लक्ष्मीकांत मिश्रा आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्राद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यामुळे जर आता पीएमपीने एमएनजीएलचे थकीत बिल वेळेत अदा केले नाही आणि येत्या 14 जूनपासून सीएनजीचा पुरवठा बंद झाला, तर त्याचा मोठा परिणाम पीएमपीच्या वाहतुकीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news