नाशिक : कांदा भरलेल्या वाहनाला अपघात | पुढारी

नाशिक : कांदा भरलेल्या वाहनाला अपघात

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे चारचाकी ईरटीका वाहन आणि कांद्याने भरलेला छोटा हत्ती वाहनाला धडकल्याने अपघात झाला आहे. यामध्ये कांद्याने भरलेले वाहन पलटी झाल्याने कांदा उत्पादकाचे मोठे नुकसान झाले आहे.

येवला तालुक्यातील हंडेवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार असलेल्या विंचूर येथे कांदा विक्रीसाठी घेऊन जात होते. नाशिक औरंगाबाद राज्यमार्गावरील निफाड तालुक्यातील भरवस फाट्याजवळ चंद्र-सूर्य मन्दिर समोर ईरटीका वाहन समोरून आल्याने कांद्याने भरलेल्या छोटा हत्ती वाहनाला जोरदार धडकली. त्यामुळे छोटा हत्ती रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. त्यामुळे राज्य मार्गावर कांद्याची चादरच पसरली. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांखाली रस्त्यावरील कांदा दबल्यामुळे कांदा उत्पादकाचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च तर सोडा वाहतूक खर्चावरही पाणी सोडावे लागले आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली  नसून याप्रकरणी लासलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा:

Back to top button