चिचोंडीची नव्याने भर; नागरदेवळेचा गुंता कायम

चिचोंडीची नव्याने भर; नागरदेवळेचा गुंता कायम
Published on
Updated on

नगर तालुका : नगर तालुक्यात पूर्वी सहा जिल्हा परिषद गट व 12 गण होते. नव्याने करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे 2 गण वाढले आहेत. देहरे, जेऊर, नागरदेवळे, चिचोंडी पाटील, दरेवाडी, नवनागापूर, वाळकी असे सात जिल्हा परिषद गट, तर देहरे, निमगाव वाघा, जेऊर, शेंडी, नागरदेवळे, बुर्‍हाणनगर, केकती, चिचोंडी पाटील, दरेवाडी, अरणगाव, नवनागापूर, निंबळक, वाळकी, गुंडेगाव असे 14 पंचायत समितीचे गण निर्माण झाले आहेत. नव्या प्रारूप रचनेत पूर्वीच्या निंबळक गटाचे नाव बदलून नवनागापूर हा नवीन गट, तर चिचोंडी पाटील हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे.
प्रशासनाने केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात गट व गणांची जोडतोड करण्यात आली आहे.

नव्याने करण्यात आलेल्या देहरे गटात कर्जुनेखारे येथील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, पिंपळगाव माळवीचे रहिवासी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती रघुनाथ झिने व सरपंच सुभाष झिने, तसेच मांजरसुंबाचे सरपंच जालिंदर कदम, देहरे येथील माजी पंचायत समिती सदस्य अरुण लांडगे, व्ही. डी. काळे, पिंप्री घुमट येथील रभाजी सूळ यांचीही गावे या गटात आहेत. याशिवाय आदर्शगाव हिवरेबाजारचा समावेशही या गटात करण्यात आला आहे.

पूर्वीच्या निंबळक गटाचे नाव बदलून आता नवनागापूर, असे करण्यात आले आहे. या ठिकाणी निंबळकचे माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, नेप्ती येथील अरुण होळकर, भोरवाडी येथील पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांच्यासह नवनागापूर येथील बंडू सप्रे, डॉ. बबनराव डोंगरे, दत्ता सप्रे, वडगाव गुप्ता येथील सरपंच विजय शेवाळे यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. वाळकी गटात गुंडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, वडगाव तांदळी येथील नगर बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, सारोळा कासार येथील माजी पंचायत समिती सदस्य बंडू कडूस, वाळकी येथील भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, रुईछत्तीशी येथील प्रभाकर भांबरे, रमेश भांबरे यांचेही गावे या गटात आहेत. दरेवाडी गटात येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, हरिभाऊ कर्डिले, यांच्यासह दीपक कार्ले, माजी सरपंच अनिल करांडे यांचीही गावे या गटात आहेत. जेऊर व नागरदेवळे गटातही इच्छुकांची संख्या मोठी आहे.

नागरदेवळेच्या अंतिम निर्णयानंतर फेररचना होण्याची शक्यता

नगर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीच्या 14 गणांची प्रारूप प्रभाग रचना आज प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या तीन गावांची मिळून स्वतंत्र नगरपरिषद करण्याची घोषणा झाली असून, ही तीनही गावे प्रारूप प्रभाग रचनेत समाविष्ट आहेत. हरकतींच्या सुनावणीनंतर नगर तालुक्यातील गट व गणांची फेररचना होणे अटळ असल्याने या प्रभाग रचनेला कितपत महत्त्व दिले जाते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

27 जूनपर्यंत वाट पहावी लागणार

नगर तालुक्यातील गट व गणांची प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. दरम्यानच्या काळात 20 मे या दिवशी नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी या तीन गावांची मिळून नगरपरिषद करण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिध्द केला. 8 जूनपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे हरकती दाखल केल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर 27 जूनला अंतिम प्रभाग रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील अंतिम गट व गण रचनेला 27 जूनपर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

एक नजर बदलावर

शिवसेनेचेेे संदेश कार्ले, शरद झोडगे यांच्या गटाची तोडफोड होऊन चिचोंडी पाटील हा नवा गट निर्माण झाला. माधव लामखडे यांच्या निंबळक गटाचे नामकरण नवनागापूर झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news