पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या हस्ते कलाटे उद्यानाचे उद्घाटन | पुढारी

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या हस्ते कलाटे उद्यानाचे उद्घाटन

वाकड : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे शुक्रवारी कै. तानाजी तुकाराम कलाटे उद्यानाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड मधील असे म्युझिकल उद्यान पहिल्यांदाच वाकड मध्ये बनविण्यात आले असून, हे उद्यान अडीच एकर जागेवर वसविले आहे. या उद्यानात अडीचशे झाडे लावण्यात आली असून, 311 मीटरचा जॉगिंग ट्रॅकही उभारण्यात आला आहे. येथे 388 मीटरचा फुटपाथ असून या उद्यानामध्ये म्युझिकल इन्स्ट्रूमेंट रंभा- संभा, चाम्स, स्टूल, ड्रम, डमरू व्हायोलिन म्युझिकल सिंबॉल, बासरी, इत्यादी प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या उद्यानामुळे वाकडच्या साैंदर्यात भर पडणार आहे.

राहुल गांधींना ईडीची पुन्हा एकदा नोटीस

या उद्यानाचे काम 24 महिन्यात पूर्ण करण्यात आले असून, यासाठी सात कोटी 46 लाख 75 हजार 432 रुपये खर्च आला आहे. हे उद्यान देखभालीसाठी बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर, स्थानिक नगरसेवक राहुल कलाटे, मयुर कलाटे, अश्विनीताई वाघमारे तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले , राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे उपस्थित होते. तसेच वाकड परिसरातून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, स्थानिक कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केली होती.

शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मीर पंडितांना वाचवा; संजय राऊतांचा भाजपला टोला

भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

हा कार्यक्रम सुरु असताना भाजप चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे आणि कार्यकर्ते राम वाकडकर, विशालआप्पा कलाटे , कुणाल वावळकर , श्रीनिवास कलाटे, यांनी प्रशासनाचा निषेध करत उद्यान परिसरात घोषणाबाजी केली.

संतोष कलाटे म्हणाले की ही जागा आमच्या आजोबांच्या नावावर होती, त्यामुळे त्या उद्यानाला आमच्या आजोबांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती, तसा पाठपुरावाही केला होता.
परंतु प्रशासनाने आमची मागणी मान्य केली नसल्यामुळे त्यांनी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर मुंडण करून या प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या प्रश्नी आपण उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Back to top button