पुणतांबा शेतकरी आंदोलन: कृषीमंत्री दादा भुसे उद्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार, आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता | पुढारी

पुणतांबा शेतकरी आंदोलन: कृषीमंत्री दादा भुसे उद्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार, आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता

पुणतांबा: शेतकऱ्यांच्या आठ मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर महाविकास आघाडी सरकार सकारात्मक दिसत असुन गुरूवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे भेट दिल्यानंतर उद्या शनिवारी कृषीमंत्री दादा भुसे किसान कांतीच्या पदाधिकाऱी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यामुळे आता आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे आहे.

दुधाला हमी भाव, शिल्लक उसाला भरपाई यासह अन्य मागण्यांसाठी 1 जुन पासून किसान कांतीच्या वतीने धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनास राज्यातील विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनीही भेट देऊन पाठिंबा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाला अद्याप भेट दिली नसताना सरकारने, मात्र तातडीने दखल घेतली असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.

चिचोंडीची नव्याने भर; नागरदेवळेचा गुंता कायम

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संवाद साधुन मागण्यांवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली जाणार असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी आंदोलनाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून कृषी मंत्री दादा भुसे यांना मागण्यांबाबत माहिती दिली. यादरम्यान किसान कांतीच्या पदाधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरून भुसे यांनी संवाद साधला व आपल्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.

शनिवारी 4 मे रोजी सकाळी 10 वाजता कृषीमंत्री भुसे पुणतांबा येथे येणार असून मागण्यांवर योग्य निर्णय झाल्यास आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतात उभ्या असलेल्या ऊसाची मोळी पेटवून आणि दुध मोफत वाटून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. श्रीगोंदा येथील कृषीकन्या शुभांगी माने हिने कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा मांडली.

नगर : भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

यावेळी सरपंच डॉ धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, सुभाष कुलकर्णी, बाळासाहेब भोरकडे, मुरलीधर थोरात, सुभाष वहाडणे, नामदेव धनवटे बाळासाहेब चव्हाण, अनिल नळे ,कमलाकर कोते, महेश कुलकर्णी, भास्कर मोटकर कृषीकन्या निकीता जाधव देवीदास सोनवणे, आबा नळे सुधाकर जाधव आदी उपस्थित होते.

Back to top button