नाशिक : भंगार गोळा करणाऱ्या अल्पवयीन तरुणाचा खून | पुढारी

नाशिक : भंगार गोळा करणाऱ्या अल्पवयीन तरुणाचा खून

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा :

चांदवड तालुक्यातील जांबुटके धरण परिसरात भंगार गोळा करणाऱ्या 17 वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञात मारेकर्‍यांनी दगडाने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. फिर्याददाराच्या माहितीवरून अज्ञात खून करणाऱ्या मारेकऱ्याविरोधात वडनेरभैरव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव बसवंत येथील वणी रोड देवीचे बरड नायरा पेट्रोलपंपाच्या पाठीमागे राहत असलेल्या सूरज तिलक प्रजापती (१७, मूळचा रा. नगरपालिका महाराजगंज कपिलवस्तू तेनूवा, जिल्हा कृष्णानगर, नेपाळ) हा भंगार गोळा करतो. या तरुणाला अज्ञात व्यक्तीने मंगळवारी (दि. ३१) दुपारी भंगार देतो, असे सांगून पिंपळणारे गावाच्या परिसरातील जांबुटके धरणाच्या बाजूला डोंगराजवळ झाडाझुडपांत नेऊन त्याच्या डोक्यात दगडाने वार केला. या घटनेबाबत राजेश राधेश्याम गुप्ता (२८, मूळचे रा. नगरपालिका महाराजगंज कपिलवस्तू तेनूवा, जिल्हा कृष्णानगर, नेपाळ; हल्ली रा. वणी रोड देवीचे बरड नायरा पेट्रोलपंपाचे पाठीमागे, पिंपळगाव बसवंत, निफाड) यांनी फिर्याद दिल्याने या घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक शकील शेख, पोलिस उपनिरीक्षक डी. एम. गवारे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेची माहिती मिळताच मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खाडवी मनमाड पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button