नांदेड : आईनेच केला दाेन मुलांचा खून, मृतदेह जाळून पुरावे नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न | पुढारी

नांदेड : आईनेच केला दाेन मुलांचा खून, मृतदेह जाळून पुरावे नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न

भोकर, पुढारी वृत्तसेवा : पोटच्या गोळ्याला जीवापाड जपणारी आई असते पण, याच धारणेला काळीमा फासणारी  घटना भोकर तालुक्यातील पांडुरणा येथे घडली. एका ३० वर्षीय निर्दयी महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांना जीवे मारले. यानंतर आपल्‍या आई व भावाच्या साह्याने चिमुकल्यांचे मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याची घटना उघडकीस आली आहे.

भोकर तालुक्यातील पांडुरणा येथील धुरपता गणपत निमलवाड (वय ३०) हिस दत्ता व अनुसया असे दोन अपत्ये होती.३१ मे च्या रात्री  धुरपता हिने स्वतः चा मुलगा दत्ता निमलवाड (वय २) वर्षे व मुलगी अनुसया निमलवाड  (वय ४) या दोघांचा खून केला. आई कोंडाबाई राजेमोड, भाऊ माधव राजेमोड ( दोघेही रा. ब्राह्मण वाडा) यांच्या साहाय्याने दोन्ही मुलांचे मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्‍याचा प्रयत्‍न केला.

या बाबत गोविंद निमलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकर पोलीस ठाण्यात धुरपता निमलवाड, कोंडाबाई राजेमोड, माधव राजेमोड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी तीन ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button