शहरात शनिवारी रिव्हर प्लॉगेथॉन; प्लास्टिकमुक्त अभियानास नागरिकांचा प्रतिसाद | पुढारी

शहरात शनिवारी रिव्हर प्लॉगेथॉन; प्लास्टिकमुक्त अभियानास नागरिकांचा प्रतिसाद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानात सार्वजनिक गणेश मंडळ, स्वयंसेवी संस्था व संघटनांसोबत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. येत्या रविवारी रिव्हर प्लॉगेथॉन मोहिम तिन्ही नद्यांच्या काठी राबविण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

पालिकेकडून प्लास्टिक मुक्तीसाठी 25 मे ते 5 जून या कालावधीत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवृत्त अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, आठही क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्याधिकारी यांच्यासह महाविद्यालये, सामाजिक संस्था, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डांगे चौकातील मुख्य रस्त्याची दुरवस्था

अतिरिक्त आयुक्त ढाकणे म्हणाले की, प्लास्टिक वापराचे तोटे, पर्यावरणाला, जैवविविधतेला प्लास्टिक वापरामुळे निर्माण होणारे धोके याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांच्या वापर करावा.

बैठकीत प्रतिनिधींनी अनेक सूचना मांडल्या. या उपक्रमात सार्वजनिक गणेश मंडळे, आणि मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना सहभागी करून घ्यावे. नदीकाठी असणारे निर्माल्य कुंड पुन्हा सुरु करावेत. सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक वापरणार्‍यांवर कारवाई करावी. प्लास्टिक संकलित करण्यासाठी वेगळी घंटागाडी सुरु करावी, अशा सूचना करण्यात आल्या.

भाजपच्या बैलगाडा शर्यतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची भिर्रर्र !

शहरात रिव्हर प्लॉगेथॉन मोहिम शनिवारी (दि.4) सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत राबविण्यात येणार आहे. यामध्ये पवना नदीमध्ये किवळे ते संगम येथे, मुळा नदीमध्ये वाकड ते संगम येथे, इंद्रायणी नदीमध्ये तळवडे ते चर्‍होली येथे मोहिम घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ढाकणे यांनी केले आहे.

Back to top button