IPL 2024 : आयपीएल प्लेऑफमध्ये कोण बाजी मारणार? | पुढारी

IPL 2024 : आयपीएल प्लेऑफमध्ये कोण बाजी मारणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्याही संघाला प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आलेले नाही. 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल असे मानले जात होते, पण ऋषभ पंतच्या संघाने तसे होऊ दिले नाही. विशेष म्हणजे अद्यापही कोणताच संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही आणि कोणताही संघ स्पर्धेतून बाहेर पडलेलाही नाही. सध्या गुणतालिकेत तळाला असलेले मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे संघही शर्यतीत आहेत.

कोलकाता-राजस्थान आघाडीवर (IPL 2024 Playoffs)

इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात आतापर्यंत एकूण 56 सामने खेळले गेले आहेत. सध्या फक्त दोनच संघ प्लेऑफच्या सर्वात जवळ असल्याचे दिसत असून ते पात्र होऊ शकतात अशी चर्चा आहे. पण सध्या तरी तसे झालेले नाही. सध्याच्या पॉइंट टेबलवर नजर टाकल्यास, केकेआर हा संघ सध्या 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचेही तेवढेच गुण आहेत. इतके गुण मिळवूनही हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतील, पण त्यांच्या नावासमोर ‘क्यू’ लागण्यासाठी आणखी किमान एक विजय आवश्यक आहे, ज्याची या दोन्ही संघांना प्रतिक्षा आहे.

सीएसके, सनरायझर्स हैदराबाद, एलएसजी, डीसी बरोबरीत

चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स यांचे गुण समसमान आहेत. चारही संघाच्या खात्यात 12 गुणांची भर पडली आहे. म्हणजे इथे एक प्रकारे चुरस पहायला मिळत आहे. यानंतर आरसीबी, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा क्रमांक लागतो, ज्यांचेही आठ-आठ गुण आहेत. हे चार संघही प्लेऑफच्या शर्यतीत असले तरी येथून प्लेऑफमध्ये जाणे त्यांच्यासाठी खूपच अवघड दिसत आहे. (IPL 2024 Playoffs)

संबंधित बातम्या

केकेआर-आरआरची जागा जवळपास निश्चित

खरंतर केकेआर राजस्थानचा संघही प्लेऑफमध्ये जाईल, यात फारशी शंका नसावी. कारण दोघांचे अजून तीन सामने बाकी आहेत आणि फक्त एक विजय आवश्यक आहे. जरी या संघांनी सर्व सामने गमावले तरीही शक्यता जिवंत राहतील. यानंतर आणखी दोन जागांसाठी लढत सुरू राहणार आहे. असे मानले पाहिजे की सध्या 12 गुणांसह उभे असलेल्या चार संघांपैकी कोणतेही दोन संघ अव्वल 4 मध्ये आपले स्थान निश्चित करतील. म्हणजेच आगामी सामने जास्त महत्त्वाचे असणार आहेत. (IPL 2024 Playoffs)

हेही वाचा

 

Back to top button