देशात ४९ मतदारसंघातून ६९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, महाराष्ट्रात १३ जागांसाठी २६४ उमेदवार | पुढारी

देशात ४९ मतदारसंघातून ६९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, महाराष्ट्रात १३ जागांसाठी २६४ उमेदवार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूकीच्या ५ व्या टप्प्यात देशातील ४९ मतदारसंघातून ६९५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक आयोगाने बुधवारी (८ मे) जाहीर केलेल्या माहितीनुसार, देशात ५ व्या टप्प्यात ८ राज्य/केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात १३ लोकसभा जागांवर मतदान होणार असून, २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या ५ टप्प्यासाठी ३ मेरोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, देशातील ४९ मतदारसंघांमधून १५८६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ७४९ अर्ज छाननीनंतर निवडणूक आयोगाने वैध ग्राह्य केले. त्यानंतर काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यावर ही संख्या ६९५ इतकी राहिली आहे. देशात ५ टप्प्यासाठी २० मेरोजी मतदान होणार आहे.

  ५ व्या टप्प्यासाठी देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक ५१२ अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीच्या ५ व्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वाधिक ५१२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननी आणि उमेदवारांच्या माघारीनंतर आता महाराष्ट्रातील १३ जागांसाठी २६४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यापाठोपाठ उत्तर प्रदेशातून १४ लोकसभा जागांसाठी ४६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

हेही वाचा 

Back to top button