जळगाव : अनैतिक संबंधाच्‍या संशयातून एकमेकांवर चाकूने वार; परस्परविरोधी गुन्हे | पुढारी

जळगाव : अनैतिक संबंधाच्‍या संशयातून एकमेकांवर चाकूने वार; परस्परविरोधी गुन्हे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा:   अनैतिक संबंध असल्‍याच्‍या संशयातून दाेघांनी एकमेकांवर चाकुने वार केल्‍याची घटना आंबेडकर नगरमध्‍ये घडली. अनैतिक संबंध असल्‍याच्‍या संशयातून घडलेल्‍या या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गणेश सखाराम भंडारे (रा. गणपती मंदिराजवळ, कुसुंबा) हा एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो सध्या कारागृहात आहे. कोरोनामुळे त्याला पॅरोल मिळाली.

गणेश गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आपल्या घरी आला. त्‍याची पत्नी घरी नव्‍हती.आपली पत्‍नी विनोद अशोक बोरसे (रा. आंबेडकरनगर, जळगाव) याच्या घरी गेल्‍याची माहिती त्‍याला मिळाली.

गणेश हा आंबेडकर नगरातील विनोदच्या घरी गेला. दोघांमध्‍य वाद झाला.

विनोदने गणेशवर चाकू हल्ला केला. तर पतीने त्याच्या पायाला चावा घेतला. तर याच झटापटीत गणेशनेही विनोदवर चाकूने वार केले.

या प्रकरणी गणेश सखाराम भंडारे (रा. गणपती मंदिराजवळ, कुसुंबा) आणि विनोद अशोक बोरसे (रा. आंबेडकरनगर, जळगाव) यांनी शनिपेठ पोलीस स्थानकात परस्‍परविरोधी फिर्यादी दिल्‍या आहेत. यानुसार दोघांविरोधातगुन्‍हा दाखल झाला आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ : बोरिवली मध्ये NO KISSING ZONE !

Back to top button