श्रीनगर ; पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीर मधील बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. बडगाम येथील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एके ४७ रायफल आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बडगामधील मोचवा येथे सुरक्षा दलाने शोध मोहिम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार झाला. दरम्यान, शुक्रवारी रात्री बनिहालमध्येही ग्रेनेड हल्ला झाला. मागील दोन दिवसांमध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला ५ ऑगस्ट रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. यामुळे राज्यात पोलिसांनी अर्लट जारी केला आहे.
शुक्रवारीच थन्नामंडी तालुक्यातील पंगाई गावातील जंगलात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. पाकिस्तानमधून घुसखोरीचा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडण्यात आला. या वर्षातील राजोरी जिल्ह्यात सातव्यांदा चकमक झाली आहे.
राजोरी परिसरात पुन्हा एकदा दहशत माजविण्याचा कट असल्याचे स्पष्ट झाले होते.दरम्यान, सांबा जिल्ह्यातील राजपूरा सेक्टरमधील सीमेजवळ शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
या परिसरात ड्रोन निदर्शनास आले होते. त्यामुळे पाकिस्तानने ड्रोनच्या मदतीने हा साठा परिसरात टाकला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
हेही वाचलं का?