झाडाची कोवळी पाने खाण्यासाठी बकरी ने लढवली शक्‍कल! | पुढारी

झाडाची कोवळी पाने खाण्यासाठी बकरी ने लढवली शक्‍कल!

नवी दिल्‍ली :  बकरी : घड्याच्या तळाशी गेलेले पाणी वर आणण्यासाठी कावळ्याने त्यामध्ये टाकलेले खडे किंवा तत्सम गोष्टी अगदीच काल्पनिक नसतात. पशुपक्षीही गरजेच्या वेळी आपल्या बुद्धीची चुणूक माणसाला दाखवून देतात.

अशाच एका चतूर बकरी चा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये झाडावरील कोवळी पाने खाण्यासाठी बकरीची शक्‍कल लढवल्‍याचे दिसून आले.

या व्हिडीओमध्ये दिसते की एका झाडाला म्हैस बांधून ठेवलेली आहे. तिच्या शेजारीच दोन बकर्‍याही आहेत. त्यापैकी एक बकरी बसलेली असून दुसरी बकरी झाडावरच्या उंच गेलेल्या फांदीवरची पाने खाण्यासाठी उत्सुक आहे.

ही बकरी म्हशीच्या डोक्यावरून उडी मारून तिच्या पाठीवर चढते आणि नंतर दोन पाय झाडाला टेकवून उभी राहते. त्यानंतर तिच्या तोंडापर्यंत सहजच झाडाची पाने येतात व ती ही पाने खाऊ लागते.

आयपीएस ऑफिसर रूपिन शर्मा यांनी या चतूर बकरीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअरकेला आहे.

या बकरीची करामत आतापर्यंत 24 हजारांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिली आहे. दोन हजारांपेक्षाही अधिक लोकांनी तो लाईक केला असून 300 पेक्षा अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे.

Back to top button