आरोग्यासाठी लसूण आहे बहुगुणी! | पुढारी

आरोग्यासाठी लसूण आहे बहुगुणी!

नवी दिल्‍ली; पुढारी वृत्‍तसेवा :   बहुगुणी लसूण : भारतीय आहारात वापरले जाणारे अनेक पदार्थ आरोग्यासाठीही लाभदायक असतात.

त्यामध्ये हळद, आले, लसूण आदी अनेक पदार्थांचा व मसाल्यांचा समावेश होतो.

भारतात पाच हजारांपेक्षाही अधिक वर्षांपासून लसणाचा आहारात वापर होत आला आहे.

हा लसूण पदार्थांचा स्वाद वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही बहुगुणी ठरतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

यामध्ये ‘अ’,‘ब’,‘क’ जीवनसत्त्वे तसेच आयोडिन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्‍नेशियम असे पोषक घटक असतात.

लसणामध्ये ‘अँटिबॅक्टेरियल’ गुणही आहेत. लसणामुळे शरीरातील इन्शुलिनचा स्तर वाढवते व मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते लाभदायक ठरते.

कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

रक्‍ताचे शुद्धीकरण व रक्‍त पातळ होण्यासही मदत होते. त्यामुळे रक्‍ताच्या गाठी निर्माण होत नाहीत. लसणाचा हृदयाला फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून वाचवतो.

रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते. लसणात अँटिइन्फ्मेटरी गुणही आहेत.

त्यामुळे अ‍ॅलर्जीची समस्या दूर ठेवण्यास मदत होते. वजन घटवणे, सांधेदुखी दूर करणे, रक्‍ताची कमतरता दूर करणे आदींसाठीही लसणाचा उपयोगी हाेताे.

Back to top button