नाशिक : पेठ रोड परिसरात युवकावर प्राणघातक हल्ला | पुढारी

नाशिक : पेठ रोड परिसरात युवकावर प्राणघातक हल्ला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पेठ रोडवरील नमन हॉटेलच्या पाठीमागील परिसरात एका युवकावर शनिवारी (दि.30) दुपारी पाच ते सहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. आदित्य रामदास पिंगळे (19, रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद, नाशिक) असे जखमी तरुणाचे नाव आहे. यात आदित्य पिंगळे हा गंभीर जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत झाली आहेत. म्हसरूळच्या हद्दीतील नमन हॉटेल मागील रस्त्यावरच ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी दुपारी आदित्य हा नमन हॉटेलच्या परिसरात उपस्थित असताना त्याच्या ओळखीचे पाच ते सहा संशयित आले. त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्यावर धारदार हत्याराने वार केले. यानंतर संशयित पळून गेले. या घटनेत अतिरक्तस्राव झाल्याने आदित्यवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

हेही वाचा :

Back to top button