

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रकृती बिघडल्यामुळे खासदार नवनीत राणा यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यापासून भायखळा कारागृहात असणाऱ्या खासदार राणा स्पाँडिलिसिसचा आजाराचा त्रास आहे. कारागृहामध्ये फरशीवर झोपल्यामुळे त्यांचा हा त्रास वाढला आहे, असे पत्र त्यांच्या वकिलांनी कारागृहात प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यानुसार आज त्यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
राणा दाम्पत्यावर 124 अ (राजद्रोह) कलमाखाली अटक करण्यात आली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली. रवी राणा यांना तळोजा कारागृहात तर नवनीत राणा यांची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली होती. सत्र न्यायालयात आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मंगळवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती; पण न्यायालयाकडे याआधीच्या प्रलंबित खटल्यांमुळे वेळ नसल्याच्या कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
हेही वाचा