नाशिक : नवनियुक्त फौजदारांचे स्वागत भोवणार | पुढारी

नाशिक : नवनियुक्त फौजदारांचे स्वागत भोवणार

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक झालेल्या उमेदवारांचे पंडित कॉलनीतील एका अभ्यासिकेजवळ जल्लोषात स्वागत करण्यात आले. उत्साही विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत गर्दी केली होती. या विद्यार्थ्यांवर कारवाई करणार असल्याचे सरकारवाडा पोलिसांनी सांगितले.

2019 साली घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लागला. त्यात जिल्ह्यातील अनेक परिक्षार्थी उत्तीर्ण झाले. त्यात काही शहरातील अभ्यासिकेतील असल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत होते. त्यानुसार शनिवारी पंडित कॉलनीतील एका अभ्यासिकेजवळ उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांनी सांगितले.

हेही वाचा :

 

Back to top button