इंधन दरवाढीसाठी केंद्र सरकार जवाबदार : काँग्रेसचा आरोप | पुढारी

इंधन दरवाढीसाठी केंद्र सरकार जवाबदार : काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रात ज्यावेळी डॉ. मनमोहन सिंह सत्तेत होते. त्यावेळी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी १.६४ लाख कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. परंतु, आता हे अनुदान कमी करण्यात आले असून त्यामुळे देशातील पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ  (Fuel price hike) झाली आहे, असा आरोप करीत देशातील वाढत्या महागाईवरुन काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत (Fuel price hike) असल्याचा सरकारचा दावा चुकीचा असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने लावलेल्या एक्साईज करामुळे पेट्रोलच्या किंमती वाढत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, गेल्या चार दिवसांपासून देशातील पेट्रोलची किंमत सातत्याने वाढत आहे. मे २०१४ साली ज्यावेळी मोदी सत्तेत आले, त्यावेळी पेट्रोलवरील एक्साईज कर हा ९.२० रुपये तर डिझेलवरील एक्साईज कर हा ३.४६ रुपये इतका होता. गेल्या आठ वर्षांमध्ये या करामध्ये डिझेलवर ५३१ टक्क्यांची तर पेट्रोलमध्ये २०३ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे सुरजेवाला म्हणाले. अशात पुन्हा एकदा काँग्रेस इंधन दरवाढी वरून सत्ताधाऱ्यांना घेणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचलंत का ?  

Back to top button