नाशिक : अवकाळीनंतर आता उष्म्यात वाढ ; हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती | पुढारी

नाशिक : अवकाळीनंतर आता उष्म्यात वाढ ; हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती

नाशिक : अवकाळी पावसाच्या मार्‍यानंतर उष्म्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. शनिवारी (दि. 11) नाशिकमध्ये पारा 33.2 अंशांवर स्थिरावला. वातावरणातील या सततच्या बदलांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमीदाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून गारपिटीसह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतीपिके धोक्यात आली असली, तरी या पावसाने हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांची उकाड्यातून मुक्तता झाली. पण, नाशिक शहरासह ग्रामीण भागात शनिवारी पावसाने उघडीप घेतली. त्यामुळे तापमानाच्या पार्‍यात लक्षणीय वाढ झाली आहे. नाशिक शहरातील पारा 33 अंशांपलीकडे जाऊन पोहोचला. सर्वसामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत, तर ग्रामीण भागातील जनजीवनावरही तीव्र उन्हाचा परिणाम होत आहे.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना पंखे, एसी व कूलरची मदत घ्यावी लागत आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाच्या पार्‍यात मोठी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button