नाशिक : खैर लाकडाची चोरी पकडली ; वाहनचालकासह चोरटे मात्र फरार | पुढारी

नाशिक : खैर लाकडाची चोरी पकडली ; वाहनचालकासह चोरटे मात्र फरार

नाशिक (पेठ) पुढारी वृत्तसेवा :  नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यामधील झरी वनपरिक्षेत्रात अंबास गावानजिक पहाटेच्या सुमारास खैर प्रजातीच्या लाकडाची चोरटी वाहतूक करणा-या वाहनासह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला.

खैरांच्या लाकडांची चोरटी वाहतूक करत असल्याची गुप्त माहीती फिरत्या पथकाला मिळाली त्यानुसार वनविकास महामंडळाच्या गस्तीपथकाने सापळा लावून अंबास गावानजिक पिकअप क्रमांक एम एच ११ टी ५३६९ या खैराच्या लाकडाने भरलेला वाहनाचा पाठलाग करून शिताफीने पकडले. मात्र वाहन चालक व सोबत असलेले इतर हे वाहन सोडुन पसार झाले.

या वाहनातील एकूण चार लाख पन्नास हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. वाहन व खैराची लाकडे पेठ आगारात जमा करण्यात आली आहेत.

वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक पी. टी मोराणकर, विभागीय व्यवस्थापक सौ. टी. टी. ठाकुर, सहाय्यक व्यवस्थापक डी. पी. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झरी वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. जाधव, आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. अजेस्र,  वनपाल एस. एच. भारोटे, एच. बी. राऊत, सी. जे. चौरे, पी. पी. तायडे, बी. पी. तायडे, एस. के बोरसे, एम. जी. वाघ, आर. ए. गवळी, एम. व्ही. विसपुते, वाहन चालक हेमंत भोये, पोलीस नायक हेमराज गवळी व फिरते पथक यांच्या एकत्रित वनसंरक्षक गस्ती पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

Back to top button