Karisma Kapoor : करिश्मा कपूर कोरोना पाॅझिटिव्ह, करिनानं दिली माहिती | पुढारी

Karisma Kapoor : करिश्मा कपूर कोरोना पाॅझिटिव्ह, करिनानं दिली माहिती

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरनंतर आता तिची मोठी बहीण करिश्मा कपूरची ( karisma kapoor) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे. करिना आणि काजोल याच्या भेटीदरम्यान याबाबतची माहिती करिनाने दिली आहे. परंतु, करिश्माने स्वत: याबाबतची कोणताही अद्याप माहिती सोशल मीडियावर दिलेली नाही. यामुळे चाहते अनेक तर्क- वितर्क लढवत आहेत.

नुकत्याच काजोल आणि करिना कपूर मेहबूब स्टुडिओच्या बाहेर भेटल्या. या भेटीदरम्यान काजोलने करिनाच्या प्रकृतीसोबत कुटुंबियाची चौकशी केली. या संभाषणाचा एक व्हिडिओ विरल भयानी या इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काजोल आणि करिश्मा एका अलिशान कारच्या मागे उभी असून एकमेंकीशी मजेशीरपणे बोलताना दिसत आहेत. यावेळी दोघींनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले आहेत. ब्लॅक अँड व्हाइट रंगाच्या शर्ट आणि डेनिममध्ये दोघीही ग्लॅमरस दिसत होत्या.

याच दरम्यान काजोलने करिनाला कशी आहेस? विचारत तिच्या तब्येतीची चौकशी केली. याचे उत्तर देताना करिनाने सर्व काही ठिक असल्याचे सांगितले. तर पुन्हा काजोलने करिनाच्या दोन्ही मुलाच्या ( तैमुर आणि जहॉगिर) तब्येतीची चौकशी केली. यावर उत्तर देताना करिनाने हसत-हसत ‘जहॉगिर आता एक वर्षाचा झाला’ असे मजेशीर उत्तर दिले.

याचवेळी काजोलने करिनाला मोठी बहीण करिश्मा कपूरची ( karisma kapoor ) विचारपूस केली. यावेळी तिने तिची नुकतीच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. परंतु, आतापर्यंत करिश्मा कपूरने स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिलेली नाही. किंवा कोणताही पोस्ट शेअर केलेली नाही. हा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी ‘करिश्माने कोरोना झाल्याची माहिती का लपविली असावी’ अशा तर्क लावला आहे. तर काहीनीं ‘खरंच कोरोना झाला आहे का?’ असे देखील म्हटले आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, करिश्मा कपूर शेवटची २०१२ मधील ‘डेंजरस इश्क’ चित्रपटात दिसली होती. तर २०२० मध्ये ‘मेंटलहूड’ या वेब सीरिजमधून तिने अनेक वर्षांनी पुनरागमन केले होते. करिश्माने ‘प्रेम कैदी’ (१९९१) चित्रपटातून पदार्पण केले होते. यावेळी ती फक्त १७ वर्षांची होती. करिश्माला ‘जिगर’ (१९९२) चित्रपटातून खरी ओळख मिळाली. यानंतर तिने ‘अनाडी’ मध्ये काम केले. तो सुपरहिट ठरला.

याशिवाय ९० च्या दशकात करिश्मा कपूरने ‘राजा बाबू’, ‘दुलारा’, ‘सुहाग’, ‘कुली नंबर 1’, ‘गोपी किशन’, ‘साजन चले ससुराल’, ‘जीत’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. याआधी करहिना कपूरसह अनेक बॉलिवूडमधील कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती.

हेही वाचलंत का? 

(video : viralbhayani instagram वरून साभार )

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button