नाशिक : मोबाइल शॉपवर चोरांचा डल्ला ; चाळीस लाखांचे मोबाइल चोरीला | पुढारी

नाशिक : मोबाइल शॉपवर चोरांचा डल्ला ; चाळीस लाखांचे मोबाइल चोरीला

नाशिकरोड : येथील बिटको चौकातील नाशिकरोड पोलिस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टेलिपॅथी मोबाइल शॉपीवर पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी झाली असून, सुमारे तीस ते चाळीस लाख रुपयांचे मोबाइल चोरट्याने चोरून नेले आहेत.

या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर बिटको चौकात रवि रामनानी यांचे टेलिपॅथी कम्युनिकेशन मोबाइलचे दुकान आहे. या दुकानात वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल विक्रीस असल्याने परिसरात हे दालन प्रसिद्ध आहे. बुधवारी (दि.2) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील जवळपास 100 ते 130 मोबाइल चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button