नाशिकमध्ये घंटागाडीचा ठेका नव्या वादात ; बनावट कागदपत्रे सादर केल्याचा मनपाला संशय

नाशिकमध्ये घंटागाडीचा ठेका नव्या वादात ; बनावट कागदपत्रे सादर केल्याचा मनपाला संशय
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : घंटागाडी नवीन 354 कोटींचा ठेका मिळावा यासाठी काही ठेकेदारांनी अनुभवाचे बनावट दाखले नाशिक मनपाकडे सादर केल्याप्रकरणी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित ठेकेदारांच्या दाखल्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मनपाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बनावट कागदपत्रे आढळून आल्यास घंटागाडीचा ठेका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.(नाशिक मनपा)

काही ठेकेदारांनी सुरत महापालिकेत काम केल्याच्या अनुभवाचे दाखले निविदा प्रक्रियेदरम्यान जोडले असून, ही कागदपत्रे खरे की खोटे याची माहिती सुरत महापालिकेकडून घेतली जाणार आहेत. घंटागाडीच्या मागील ठेक्याची किंमत 176 कोटी होती. त्याची मुदत 4 डिसेंबर 2021 रोजी संपुष्टात आली. जानेवारीनंतर मार्चपर्यंत आणखी दोन महिने जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन घंटागाडीचा ठेका 354 कोटींवर गेला आहे. विशिष्ट ठेकेदारांसाठी निविदा प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच ठेका मिळण्यासाठी अनेक ठेकेदार कंपन्या आणि लोकप्रतिनिधींनी आपापसात मांडवली केल्याची बाब समोर आली असून, त्यातूनच काही ठेकेदारांनी बनावट कागदपत्रे जोडून ठेका मिळविण्याचा डाव हाती घेतला आहे.

नवीन ठेक्यासाठी सहाही विभागांकरिता 11 ठेकेदारांनी सहभाग घेतला असून, त्यात सिडको विभागासाठी 6, नाशिक पश्चिम 4, नाशिक पूर्व 3 प्राप्त आहेत. तर सातपूर, पंचवटी व नाशिकरोड विभागांसाठी पहिल्या टप्प्यात पुरेशा निविदा प्राप्त न झाल्याने निविदेला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार नाशिकरोडला 3, तर सातपूर व पंचवटी विभागाकरिता तिसर्‍या मुदतवाढनंतर अनुक्रमे 3 व 1 निविदा प्राप्त झाल्या आहेत. पंचवटी विभागासाठी एकच निविदा आल्याने त्याविषयी आयुक्त कैलास जाधव निर्णय घेणार आहेत. निविदेत सहभाग घेतलेल्या ठेकेदारांपैकी तीन ठेकेदारांनी चार विभागांसाठी निविदा भरताना सुरत महापालिकेत काम केल्याच्या अनुभवाचा दाखला जोडला आहे. परंतु, त्याविषयी इतर ठेकेदारांनी संशय उपस्थित केल्याने सर्वच ठेकेदारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यासाठी नाशिक मनपाने सूरत महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.

आचारसंहितेचा ठेक्याला अडसर

सध्या जुन्या ठेकेदारांना 31 मार्चपर्यंत म्हणजे दोन महिन्यांची मुदतवाढ असून, नवीन निविदा प्रक्रिया फेब—ुवारीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. निवडणूक आचारसंहितेचा अडसर नव्या ठेक्याला होऊ नये, यासाठी आचारसंहितेपूर्वीच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात असून, आचारसंहिता लागू झाल्यास जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांच्या परवानगीने अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी घेतली जाईल.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news