खासदारांनी केवळ ‘सेल्फी’ काढण्याचे काम केले : अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका | पुढारी

खासदारांनी केवळ ‘सेल्फी’ काढण्याचे काम केले : अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मागील दहा वर्षांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांनी विकासाचे कोणतेही काम केलेले नसून, केवळ मसेल्फीफ काढण्याचे काम केले आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भगिनी तसेच महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना नाव न घेता लगावला. गुरुवारी (दि. 2) इंदापूर तालुक्याच्या शेळगाव येथे महायुतीच्या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली, त्यासभेत पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे व मी राज्याच्या व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो आहे. यापुढे इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्नाबरोबर इतर विकासकामे केल्याशिवाय गप्प बसणार नाही.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, 4 जूनचा निकाल ऐतिहासिक असेल आणि बारामतीपेक्षा जास्त मताधिक्य इंदापूर तालुक्यातून देऊ. इंदापूर तालुक्याचा आजवर झालेला विकास हा फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच झाला आहे. या पुढील विकासासाठी सुनेत्रा पवार यांना मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केले. छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अ‍ॅड. लक्ष्मणराव शिंगाडे, आमदार रमेश पाटील, प्रताप पाटील, माजी सभापती प्रवीण माने, अंकिता पाटील, राजवर्धन पाटील, लालासाहेब पवार, विठ्ठल जाधव, सरपंच ऊर्मिला शिंगाडे, अ‍ॅड. शरद जामदार, हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, वसंत मोहोळकर, अनिल बागल, शशिकांत तरंगे, मोहन दुधाळ, युवराज म्हस्के, दत्तात्रय फडतरे, साधना केकान, गजानन वाकसे, नारायण खराडे, विलास भांगे, रसूल शिंदे, प्रताप चवरे, वैभव शिंगाडे, राहुल जाधव, महेश खराडे, बापुराव दुधाळ, छगन शिंगाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन सपकळ यांनी आभार मानले.

हेही वाचा

Back to top button