दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन नाही, ऑफलाईन पद्धतीनेच होणार, राज्य शिक्षण मंडळाची माहिती | पुढारी

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन नाही, ऑफलाईन पद्धतीनेच होणार, राज्य शिक्षण मंडळाची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी ही माहिती दिली आहे. प्रात्याक्षिक परीक्षा दोन कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक, विषयतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या काळात होतील.

बारावीची परीक्षा ४ मार्चपासून

राज्य मंडळ पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

– दहावी- बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार

– परीक्षा दिलेल्या वेळेतच होणार.

– प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दोन कालावधी

– परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक नाही.

– परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी पॉजिटिव्ह आल्यास त्याला पुरवणी परीक्षेत संधी

– यंदा प्रत्येक शाळेत परीक्षा केंद्र

– एका शाळेत १५ पेक्षा जास्त – परिक्षार्थो असतील तर तिथे परीक्षा केंद्र करणार

– भरारी पथकांमध्ये वाढ

– आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या १४ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांची नोंदणी

१२ वी ची तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारीपासून होणार आहे. कोविड १९ मुळे शाळा तिथं उपकेंद्र करण्यात येईल.  सोशल डिस्टन्सिंगसाठी झिगझॅग पद्धतीने विद्यार्थ्यांना बसवले जाईल, असेही शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

यंदा बहिस्थ शिक्षक परीक्षक म्हणून न नेमता शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून काम पाहतील. बोर्डाच्या परिक्षेसाठी लस घेणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रांची संख्या चौपटीनं वाढविण्यात येतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पेपरसाठी अतिरिक्त वेळ दिला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

कोरोनाचे नियम पाळून परीक्षा होतील, असेही शिक्षण मंडळाने म्हटले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर त्याविरोधात दहावी आणि बारावीचे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

Back to top button