एकादशीला कुर्बानी न देण्याचा ओझर मुस्लिम समाजाचा निर्णय | पुढारी

एकादशीला कुर्बानी न देण्याचा ओझर मुस्लिम समाजाचा निर्णय

ओझर; पुढारी वृत्तसेवा : हिंदु समाजात आषाढी एकादशीचे अनन्यसाधारण महत्व आहे. यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी आणि मुस्लिम समाजाची बकरी ईद एकाच दिवशी आहे. सामाजिक एकोपा व सलोख्याचे वातावरण कायम टिकून रहाण्यासाठी ओझर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

येत्या गुरुवार (दि २९) रोजी उभ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायची आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मातील पवित्र समजली जाणारी बकरी ईद एकाच दिवशी येत आहे. त्या पाश्र्वभूमीवर ओझर पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी मुस्लिम समाजाच्या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्याची बैठक घेतली. या बैठकीत मुस्लिम समाजाने एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. या बैठकीस खलील पटेल, हाजी खलील कुरेशी, बाबा पठाण, उस्मान पठाण, अस्लम शेख, शादाब पठाण, एजाज अत्तार, इरफान शेख आदि उपस्थित होते.

हेही वाचा;

Back to top button