हिंगोली : मी १०० टक्के मंत्री होणार; आमदार संतोष बांगर यांचा दावा | पुढारी

हिंगोली : मी १०० टक्के मंत्री होणार; आमदार संतोष बांगर यांचा दावा

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले आहे. आम्हाला मराठवाड्यात तुमच्या सारखा एक नेता मंत्री करायचा आहे. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, मी १०० टक्के मंत्री होणारच, असा दावा शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. नांदेडमध्ये रविवारी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची बैठक पार पडली. या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बांगर यांनी हा दावा केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संतोष बांगर हे सातत्याने त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे? गेली अनेक दिवस राज्यात दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यात शिंदे गटातील अनेकांना मंत्रिपदाची इच्छा असून ते मंत्रिमंडळ विस्ताराची चातकासारखी वाट पाहत आहे. यात आता एका नव्या आमदाराची भर पडली आहे.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागताच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होईल, अशी आशा दोन्ही गटांतील इच्छुक आमदारांना होती. तसे दावेही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार केले.

हेही वाचंलत का?

Back to top button