

धायरी (पुणे) : सिंहगड रोड परिसरातील हिंगणे खुर्द, आनंदनगर, सनसिटी, माणिकबाग, वडगाव बुद्रुक, महादेवनगर, तुकाईनगर, वडगाव खुर्द, नऱ्हे, धायरी परिसरात मुसळधार पाऊस झाला.
जून महिन्याच्या सात तारखेला मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पाऊस पडेल, अशी आशा सर्वांना होती. परंतु, गेल्या बारा ते तेरा दिवसांपासून नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर परिसरात दमदार पाऊस पडल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. सकाळी अकराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी वाहत होते. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. यामुळे दुचाकीही बंद पडल्या होत्या. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. काही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचेही चित्र दिसून आले.
हेही वाचा: