धुळे : ‘त्या’ 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी | पुढारी

धुळे : 'त्या' 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे महानगरपालिका क्षेत्रातील गावांच्या ग्रामपंचायतीतील 72 कर्मचार्‍यांना महानगरपालिकेच्या अस्थापनेवर कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात आले. मात्र उर्वरीत 40 कर्मचार्‍यांचाही धुळे मनपामध्ये सामावून घेण्यात यावे अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आ. पाटील यांच्यासोबत उर्वरीत कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली.

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 10 गावांचा धुळे महानगरपालिकेत समावेश झाला. त्यानंतर या गावातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा महानगरपालिकेच्या अस्थापनेवर समावेश करण्यात यावा यासाठी आ. कुणाल पाटील यांनी शासनाकडे तसेच विधानसभेतील अधिवेशनात वारंवार मागणी केली होती. त्यामुळे 72 कर्मचार्‍यांचा धुळे मनपात समावेश करण्यात आला. मात्र उर्वरीत 40 कर्मचार्‍यांचा अद्याप समावेश झाला नसल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. सदर कर्मचार्‍यांना न्याय मिळावा म्हणून आ. कुणाल पाटील यांनी वलवाडी, भोकरसह 10 गावातील कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली.

यावेळी आ. कुणाल पाटील यांनी आपले पत्र देवून 40 कर्मचार्‍यांचा धुळे महानगरपालिकेच्या कर्मचारी अस्थापनेवर सामावून घेण्यात यावे अशी मागणी केली. सदर कर्मचार्‍यांकडे ग्रामपंचायत ठराव, धुळे मनापाचे देय पगारपत्रक, धुळे मनपा अधिकार्‍यांचे कामाचे आदेशपत्र असे तत्सम कागदपत्रे असतांनाही त्यांना डावलण्यात आले आहे. सद्या हे कर्मचारी धुळे महानगरपालिकेत कंत्राटी पध्दतीवर काम करीत आहेत. त्यामुळे या 40 कर्मचार्‍यांचाही धुळे मनपाच्या कर्मचारी अस्थापनेवर समावेश करण्यात यावा अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी आपल्या पत्रातून केली आहे. आ. पाटील यांनी या मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

हेही वाचा : 

Back to top button