मानेवर लावता येणारा ‘एसी’! | पुढारी

मानेवर लावता येणारा ‘एसी’!

टोकियो ः उन्हाळ्याने सध्या सर्वांच्याच अंगाची अक्षरशः काहिली होत आहे. अशा स्थितीत उष्माघात होऊ नये म्हणून घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातोय. घरातही लोक पंखे, कुलर, एसी लावून बसतात, पण नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत याच उष्णतेचा सामना करण्यासाठी एका कंपनीने एक खास उपकरण लाँच केले आहे. हे उपकरण अंगावर लावता येणार असून त्यामुळे शरीरही थंड राहणार आहे.

या उपकरणाला ‘स्मार्ट विअरेबल थर्मो डीव्हाईस कीट’ असे म्हटले जाते. हे उपकरण शरीरावर लावता येणार असून त्याद्वारे तापमान नियंत्रित ठेवता येईल, असा दावा या कंपनीने केला आहे. हे उपकरण व्यक्तीच्या मानेवर लावता येईल. या उपकरणात एकूण पाच कुलिंग लेव्हल तसेच बाहेरील वातावरणात गारवा असेल 4 वार्मिंग लेव्हल आहेत. या उपकरणाला रिऑन पॉकेट अ‍ॅपच्या माध्यमातून नियंत्रित करता येते. हे उपकरण मानेवर लावल्यानंतर ब्लुटूथच्या माध्यमातून त्यातील चार वार्मिंग आणि पाच कुलिंग लेव्हल नियंत्रित करता येतील.

या उपकरणाला एकदा चार्जिंग केल्यानंत ते साधारण 17 तास काम करू शकते. तसा दावा कंपनीने केला आहे. हे उपकरण शरीराला लावून रस्त्यांवरून फिरत असतानाही तुम्हाला गारवा मिळत जाईल. हल्ली काहीजण टोपीवरही छोटा फॅन बसवतात. त्याचीही ही अद्ययावत आवृत्ती म्हणता येऊ शकते!

Back to top button