

नाशिक : कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी देत एकाने तरुणीवर अत्याचार केल्याची घटना कॉलेज रोड येथील हॉटस्पाॅट कॅफेत घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात अक्षय रमेश इंगळे (रा. पेठरोड) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत संशटित अक्षयने धमकावत अत्याचार केला. तसेच बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अक्षयला अटक केली आहे.
कुरापत काढून एकास मारहाण
नाशिक : मागील वादाची कुरापत काढून संशयित संदीप उर्फ संचा भिकाजी आईरे (रा. रामवाडी) याने सुनील देवराम महाजन (रा. मेनरोड, नाशिक) यास मारहाण केलल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखळ करण्यात आला आहे. सुनील यांच्या फिर्यादीनुसार, ६ एप्रिलला ठक्कर बाजार परिसरात संदीपने दांड्याने मारहाण करीत पायास गंभीर दुखापत केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.
मेरी परिसरात पोत ओरबाडली
नाशिक : तारवाला सिग्नलकडून जाणाऱ्या मेरी रोडवर दुचाकीस्वार चोरट्यांनी मेघा सुर्यकांत आसलकर (रा. कलानगर, दिंडोरीरोड) यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून नेली. मेघा यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी १२ हजार ५०० रुपयांचा अंदाजे पाच ग्रॅम वजनाचा पोतीचा तुकडा ओरबाडून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यालयाची तोडफोड करीत प्रवाशांवर दहशत
नाशिक : द्वारका सर्कल येथे टोळक्याने ट्रॅव्हल्स कार्यालयात तोडफोड करीत व्यावसायिकास दमदाटी करीत प्रवाशांमध्येही दहशत केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत श्रीराम मंत्री (रा. नाशिकरोड) यांनी समीर शेख उर्फ पप्पी, फिरोज भाई, रोहित सिंग याच्यासह इतर ८ ते १० जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. श्रीकांत यांच्या फिर्यादीनुसार, ४ एप्रिलला संशयितांनी जमाव गोळा करून श्रीहरी ट्रॅव्हल्स, सुलक्ष्मी ट्रॅव्हल्स यांच्या कार्यालयात शिरून तोडफोड केली. तुम्हाला येथे व्यवसाय करू देणार नाही, दुकाने फोडू असा दम दिला. त्यानंतर प्रवाशांवर दहशत निर्माण केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :