Dhule Pimpalner : गावविकासासाठी पीआरए तंत्र एकमेव मार्ग -सूर्यवंशी, मोराणेत ग्रामीण अध्ययन शिबिर | पुढारी

Dhule Pimpalner : गावविकासासाठी पीआरए तंत्र एकमेव मार्ग -सूर्यवंशी, मोराणेत ग्रामीण अध्ययन शिबिर

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा
गावविकासासाठी पीआरए, तंत्र एकमेव मार्ग आहे असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जे.टी.सूर्यवंशी यांनी केले.  सुकापूर (ता.साक्री) येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे यांच्यामार्फत आयोजित ग्रामीण अध्ययन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

गावविकासासाठी पीआरए तंत्र एकमेव मार्ग आहे. ग्रामीण अध्ययन या शास्त्रीय तंत्राचा वापर ग्रामीण विकासासाठी वरदान ठरू शकतो असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बीएसडब्ल्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग ग्रामस्थांनी केला पाहिजे. या विद्यार्थ्यांकडे सहनशीलता, चिकाटी आणि दूरदृष्टी असते. आरोग्य, शिक्षण, बाल-माता मृत्यू, कुपोषण अशा समस्या सोडविण्यासाठी मार्ग काढण्यासाठी पीआरए तंत्राच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करणे व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण अध्ययन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सहा दिवसातील निवासी शिबिराचा उद्देश विशद करताना प्रास्ताविकात समन्वयक प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने शिबिर कालावधीत परिसरात २५ झाडे लावण्याचा संकल्प जाहीर केला. सुकापूर सरपंच संगीता बहिरम,न सामाजिक कार्यकर्ते तानाजी बहिरम, शिवाजी पिंपळसे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.जे.बहिरम, ग्रामविस्तार अधिकारी खाडे, प्रा.डॉ.फरिदा खान, ग्रामसेवक बिरारीस, सुकापूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे अधीक्षक विजय राजपूत, मुख्याध्यापक शरद बिरारीस आदी प्रमुख पाहुणे होते. भारती चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. राहुल भोये यांनी आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button