नगर : बजाज फायनान्सची १० लाखांची फसवणूक | पुढारी

नगर : बजाज फायनान्सची १० लाखांची फसवणूक

नगर : पुढारी वृत्तसेवा :  बनावट कर्ज प्रकरणे करून बजाज फायनान्सची 9 लाख 69 हजार 819 रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत मोबाईल शॉपीचालक दोघांसह कंपनीचा अधिकारी अशा तिघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कंपनीचे व्यवस्थापक विक्रम नामदेव गांगुर्डे (रा. बनकरवाडा, चव्हाटा, जुने नाशिक) यांनी फिर्याद दिली. प्रतीक्षा राहुल पठारे, राहुल पठारे, अजय वाबळे अशी या तिघांची नावे आहेत. मार्च 2022 मध्ये कर्ज घेतलेल्या ग्राहकांपैकी काही ग्राहकांचे कर्जाचे मासिक हप्ते बजाज फायनान्सला आले नाहीत. ही सर्व कर्ज प्रकरणे बालिकाश्रम रोडवरील प्रज्वल मोबाईल शॉपीमधील असल्याचे लक्षात आले.

चौकशी केली असता प्रज्वल मोबाईल शॉपीमधून ज्या वस्तू घेण्याकरिता बजाज कंपनीने कर्ज दिले होते त्या वस्तू ग्राहकांना न मिळता दुसर्‍याच वस्तू किंवा रोख रक्कम ग्राहकांना मिळाली. सर्व बिले ही बनावट आढळून आली. तसेच दुकानदाराच्या बँक खात्यातून कंपनी अधिकारी अजय वाबळे याच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे दिसून आले. शॉपीमार्फतची 70 प्रकरणे बनावट मिळून आली. शॉपीचे संचालकप्रतीक्षा राहुल पठारे व चालक राहुल पठारे आणि बजाज कंपनीचा अधिकारी अजय वाबळे अशांनी मिळून संगनमताने बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button