पोलिस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून | पुढारी

पोलिस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य पोलिस दलातील बहुचर्चित पोलिस भरती प्रक्रिया राबवली आहे. पोलिस दलातील सुमारे १४ हजारांपेक्षा अधिक जास्त रिक्त पदांसाठी असलेल्या भरती प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांच्या मैदानी चाचणी परीक्षेस येत्या दोन जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. नाशिक ग्रामीण दलात १७९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. अर्ज नोंदणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. राज्यात १४ हजारांपेक्षा अधिक पदे भरली जात असून, नाशिक ग्रामीणमध्ये १६४ पोलिस शिपाई व १५ चालकांची पदे भरण्यात येत आहेत. अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उमेदवारांची यादी तयार करण्याचे कामकाज सुरू आहे. उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी तयार राहण्याच्या सूचना ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने दिल्या आहेत. दोन जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू होणार असून, लवकरच वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button