नाशिक : पाथर्डी शिवारात भरदिवसा दोन लाखांची घरफोडी | पुढारी

नाशिक : पाथर्डी शिवारात भरदिवसा दोन लाखांची घरफोडी

नाशिक : पाथर्डी शिवारातील नरहरी नगर परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. छाया जयप्रकाश सेन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सुमारे नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व ७५ हजार रुपयांची रोकड असा दाेन लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button