उज्जैनच्या धर्तीवर त्र्यंबकला करणार कॉरिडॉर : ना. गिरीश महाजन यांची घोषणा | पुढारी

उज्जैनच्या धर्तीवर त्र्यंबकला करणार कॉरिडॉर : ना. गिरीश महाजन यांची घोषणा

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योर्तिर्लिंग येथे विकसित करण्यात आलेल्या ‘महाकाल लोक’च्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरला कॉरिडॉर करण्याची ग्वाही ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ‘महाकाल लोक’ परिसराचे लोकार्पण करण्यात आले. याचे थेट प्रसारण त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात करण्यात आले होते. यानिमित्त ना. महाजन त्र्यंबकेश्वर येथे आले असता त्यांनी मंदिरात पूजा-अभिषेक केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ, आ. राहुल ढिकले, तुषार भोसले आदी उपस्थित होते. ना. महाजन म्हणाले की, गुजरातचे सोमनाथ मंदिर, काशीचे वाराणसी आणि उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसराचा विकास करण्यात आला आहे. अगदी त्याच धर्तीवर वाराणसीप्रमाणे त्र्यंबकेश्वर परिसराचा विकास करून कॉरिडॉर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, विश्वस्त तृप्ती धारणे, दिनकर पाटील, कैलास घुले, भूषण अडसरे, विष्णू दोबाडे, दीपक लोणारी, सागर उजे, अशोक घागरे, कैलास चोथे, पंकज धारणे, कमलेश जोशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button