पुणे : खुनातील आरोपीला बेड्या | पुढारी

पुणे : खुनातील आरोपीला बेड्या

महाळुंगे इंगळे : चाकण औद्योगिक परिसरातील सावरदरी (ता. खेड) येथे दोन तरुणांचा खून करून फरारी आरोपीला महाळुंगे पोलिसांनी वाशीम जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपी दोन दिवसांपासून एका शेतात लपला असता पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. प्रदीप भगत (रा. सावरदरी, ता. खेड, मूळगाव वाशीम) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी प्रदीप हा फिर्यादीच्या शेजारी राहणार्‍या महिलेची वारंवार छेड काढत असे.

शनिवारी (दि.8) फिर्यादीचे पती सूरज चव्हाण (वय 27) व त्याचा मित्र अनिकेत पवार (वय 24) हे दोघे आरोपीस जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर उपचाररपुर्वीच ते मयत झाले होते. याबाबत स्वप्नाली सूरज चव्हाण (वय 29, रा. सावरदरी) यांनी फिर्याद दिली आहे. महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार योगेश आढारी, ऋषिकेश भोसुरे, राहुल सूर्यवंशी व महेश भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button