Robbery Murder in Maharashtra : विविध घटनांनी राज्य हादरले खून मारामाऱ्या, दरोडयांनी खळबळ | पुढारी

Robbery Murder in Maharashtra : विविध घटनांनी राज्य हादरले खून मारामाऱ्या, दरोडयांनी खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क

Robbery Murder in Maharashtra : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहरांमध्ये खून मारामाऱ्या बलाक्तारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यासारख्या शहरात मागच्या दोन महिन्यात दोन अंकी आकडेवारी इतक्या खूनाच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर सारख्या शहरात हनी ट्रॅपच्या घटनांनी जिल्हा हादरून निघाला तर अमली पदार्थांच्या घटनेमुळे राज्यात हा विषय चर्चेचा बनला होता. पुणे, कोल्हापूर नाशिक, जळगाव, कल्याण या जिल्ह्यांमध्ये खून मारामाऱ्या दरोडे यासारख्या घटना आज एकाच दिवसांत घडल्या यामुळे राज्य हादरून निघाले आहे.

Robbery Murder in Maharashtra : पुण्यात व्यवस्थापकावर गोळीबार करून लुटले

पिंपरखेड (ता. शिरूर, जि. पुणे) येथे बँकेमध्ये सशस्त्र दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाच नजीकच्या जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या १४ नंबर येथे अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत बुधवारी (दि. २४) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे. या दरोड्यात दरोडेखोरांनी अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती पुढे आली आहे.

जुन्नर : अनंत नागरी सहकारी पतसंस्थेवर दरोडा, व्यवस्थापकाला घातल्या गोळ्या

कल्याणमध्ये प्रेयसी-प्रियकराच्या विकृती कळस; अल्पवयीन भाऊ-बहिणीवर लैंगिक अत्याचार

कल्याणमध्ये घडलेला विचित्र प्रकार चव्हाट्यावर आला आहे. एका १४ वर्षीय मुलावर २३ वर्षीय तरुणीने लैंगिक अत्याचार तर केलाच, शिवाय तिच्या प्रियकराने पीडित मुलाच्या १६ वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पीडित भावंडांच्या जबानीवरून माथेफिरू प्रेयसी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

नाशिकमध्ये दोन ठिकाणी मोठे दरोडे

सिन्नर तालुक्यातील मलढोण येथे समृद्धी महामार्गालगत सरोदे वस्तीवर मंगळवारी (दि. 23) रात्री दीड वाजेच्या सुमारास 10 ते 12 जणांनी टोळक्याने कुटुंबातील व्यक्तींना लाथा-बु्क्क्यांनी व विटाच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. तसेच घरातील लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. (Robbery) हल्ल्यामध्ये सरोटे कुटुंबातील दोघा जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

जळगावात बंदुकीचा धाक दाखवून सात लाख लुटले

जामनेर तालुक्यातील सोनाळा येथून मोटारसायकलवर पहुरला जात असलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याला चार अज्ञात गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत, त्याच्याकडील 7 लाख रुपये हिसकावून नेले. ही घटना आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास घडली. (Robbed the merchant)

जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात. आज ते नेहमीप्रमाणे सकाळी सोनाळा येथून पहुरकडे मोटरसायकलने जात होते. सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यान फॉरेस्ट तलावाजवळ ते आले असता, अज्ञात चार जणांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील सात लाख रुपये लुटले.

कोल्हापुरातल्या शाहुवाडीतील आंबा-तळवडे येथे सशस्त्र दरोडा; दहा लाखांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर जिल्ह्यातील आज (दि.२४) शाहूवाडी तालुक्यात सशस्त्र दरोडा पडल्याची घटना समोर आली.

शाहूवाडी तालुक्यातील आंबा-तळवडे येतील शांतय्या शंकराय्या स्वामी यांच्या घरावर हा दरोडा पडला.

रात्री उशिरा दरोडा टाकून दरोडेखोरांनी १० लाख रुपयाचा मुदेमाल चोरण्यात आला आहे.

यामध्ये रोख दोन लाख रुपये, ५ तोळे सोन्याची दागिणे आणि १ बोलेरो गाडीचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

गंभीर बाब म्हणजे यामध्ये दोन जणांना कोयता आणि तलवारीने वार सुद्धा करून जखमी केल्याचे समजते.

दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून याबाबत माहिती घेत आहेत.

Back to top button