Robbed the merchant : बंदुकीचा धाक दाखवून सात लाख लुटले | पुढारी

Robbed the merchant : बंदुकीचा धाक दाखवून सात लाख लुटले

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

जामनेर तालुक्यातील सोनाळा येथून मोटारसायकलवर पहुरला जात असलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याला चार अज्ञात गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत, त्याच्याकडील 7 लाख रुपये हिसकावून नेले. ही घटना आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास घडली. (Robbed the merchant)

जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात. आज ते नेहमीप्रमाणे सकाळी सोनाळा येथून पहुरकडे मोटरसायकलने जात होते. सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यान फॉरेस्ट तलावाजवळ ते आले असता, अज्ञात चार जणांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील सात लाख रुपये लुटले.

Robbery : नाशिकमधील मलढोण येथे भीषण दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास

हे चोरटे सोनाळा येथूनच पाटील त्यांचा पाठलाग करीत होते. टोळीतील दोघेजण याआधीच तलावाजवळ थांबलेले होते. त्या दोघांनी संजय पाटील यांना धमकावत सात लाख रुपये हिसकावून घेतले.

त्यानंतर पाटील यांनी तातडीने पहूर पोलिस ठाण्यात जात, चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर पाचोरा – जामनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक भारत काकडे व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासकामी काही पथके रवाना करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय बनसोडे करीत आहे. (Robbed the merchant)

हे ही वाचा :

Back to top button