farmer leader rakesh tikait : राकेश टिकैत यांची अन्य मागण्यांसाठी सरकारला २६ जानेवारीपर्यंतची मुदत | पुढारी

farmer leader rakesh tikait : राकेश टिकैत यांची अन्य मागण्यांसाठी सरकारला २६ जानेवारीपर्यंतची मुदत

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

farmer leader rakesh tikait : दिल्ली-उत्तर प्रदेशातील गाझीपूर सीमेवर तीन कृषी कायद्याविरोधात नेतृत्व करणाऱ्या भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला नवीन अट घातली आहे.

आम्ही दिल्ली बॉर्डर या वर्षी सोडणार नसल्याचे टिकैत म्हणाले आहेत. टिकैत यांनी आपल्या भाषणामध्ये बोलता बोलता सरकारला थेट नवा अल्टीमेटम दिला आहे.

भारतीय किसान युनीयनचे नेते राकेश टिकैत यांनी आज (दि.२४) बुधवार स्पष्टपणे सांगितले की, पुढील वर्षी २६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या तर ते दिल्ली-एनसीआरच्या सिंघू, शाहजहांपूर, टिकरी आणि गाझीपूर या चार सीमेवरून शेतकरी निघून जातील.

farmer leader rakesh tikait : टिकैत पुढे म्हणाले की

केंद्र सरकारने घोषणा केली असेल तर तीन कृषी कायदे रद्द होतील.

परंतु पिकांची किमान आधारभूत किंमत आणि ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू हाही आमचा मुद्दा आहे.

यावरही सरकारने बोलावे. २६ जानेवारीपूर्वी सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतल्यास आम्ही सीमा खाली करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर निवडणुका लागल्यानंतर आम्ही निवणुकांमध्ये आमच्या अन्य काही मागण्या आहेत याबाबतही बोलणार असल्याचे टिकैत म्हणाले.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, संघर्षातून जिंकण्याचा एकमेव मार्ग आम्हाला सापडला आहे,

आमच्या संघर्षामुळे सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत.

अशा परिस्थितीत सरकारकडे आता ३५ दिवसांचा अवधी आहे.

त्यांच्या जाहीरनाम्यानुसार १ जानेवारी २०२२ रोजी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते पण त्यांना ते करता आले नाही.

१ जानेवारीपासून शेतकर्‍यांच्या मागण्यांमध्ये ही मागणी बाबत आम्ही ठाम राहणार आहे.

Back to top button