कल्याणमध्ये प्रेयसी-प्रियकराच्या विकृती कळस; अल्पवयीन भाऊ-बहिणीवर लैंगिक अत्याचार | पुढारी

कल्याणमध्ये प्रेयसी-प्रियकराच्या विकृती कळस; अल्पवयीन भाऊ-बहिणीवर लैंगिक अत्याचार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कल्याणमध्ये घडलेला विचित्र प्रकार चव्हाट्यावर आला आहे. एका १४ वर्षीय मुलावर २३ वर्षीय तरुणीने लैंगिक अत्याचार तर केलाच, शिवाय तिच्या प्रियकराने पीडित मुलाच्या १६ वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पीडित भावंडांच्या जबानीवरून माथेफिरू प्रेयसी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कल्याण पूर्व भागात लैगिंक विकृतीची एक विचित्र घटना समोर आली आहे. या अल्पवयीन भावंडांची व्यथा ऐकून पोलिसही काहीकाळ स्तब्ध झाले होते. १४ वर्षीय मुलावर २३ वर्षीय तरुणी सातत्याने लैंगिक अत्याचार करत होती. ही तरुणी पीडित मुलाची नातेवाईक असून तिने तिच्या प्रियकराला पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैगिंक संबंध करण्यास भाग पाडले. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या दोघांची विकृती वाढत होती. अखेर दोन्ही पीडित भावंडांनी आपल्यावर बेतलेल्या प्रसंगांबाबत घरात सांगितले. त्यानंतर या भावंडांसह नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या भावंडांनी आपल्यावर झालेल्या अत्याचारांची करूण कहाणी पोलिसांसमोर कथन केली. ही कहाणी ऐकून पोलिसही काहीकाळ स्तब्ध झाले होते. त्यानंतर मात्र पोलिसांनी दोघा विकृत प्रियकर व त्याच्या प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे स्वतंत्र पथक तपास करत आहे.

डोंबिवलीत एका अल्पवयीन तरुणीवर ३३ जणांनी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कारवाई करत अटक केली होती. डोंबिवलीतील ही घटना ताजी असताना लैंगिक विकृतीची एक विचित्र घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन भावा-बहिणीची व्यथा ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी सांगितले की, आमच्याकडे दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. पीडित आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. या दोन्ही प्रकरणांत संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Back to top button