‘अरे’ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी : अजित पवार | पुढारी

'अरे'ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी : अजित पवार

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : सीमाभागात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेला हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. अशा हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. असे हल्ले महाराष्ट्र सरकारने खपवून घेऊ नयेत, ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, असे आवाहन अजित पवार यांनी आज केले केले.

 सीमाभागातील मराठी भाषिकांमागे महाराष्ट्र एकजुटीने उभा

महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी. कर्नाटक सरकारच्या पाठीब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीने सीमाभागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे आहेत.

सत्तारुढ पक्षांनीही आपले कर्तव्य पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे. अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकमध्‍ये महाराष्‍ट्रातील वाहनांवर झालेल्‍या हल्‍ल्‍यांचा  निषेध केला.

हेही वाचा : 

 

Back to top button