नाशिक : ऑनलाइन वाहन बुक करणे पोलिसास पडले महागात, 22 हजारांचा गंडा | पुढारी

नाशिक : ऑनलाइन वाहन बुक करणे पोलिसास पडले महागात, 22 हजारांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबईला जाण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने कार शोधणे एका पोलिसास महागात पडले आहे. ऑनलाइन बुकींग करताना भामट्याने पोलिसाचे डेबीट कार्डची माहिती घेत बँक खात्यातून परस्पर २२ हजार ७६५ रुपये काढून घेत गंडा घातला.

विकास दौलतराव वाघ (रा. द्वारका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मुंबईला जाण्यासाठी २५ ऑगस्टला ‘रेंट अ कार’ या संकेतस्थळावरून कार बुकींग करीत होते. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या संकेतस्थळावर लॉगिंग केले असता त्यांना भामट्याने फोन केला. वाघ यांना इंडिया ट्रॅव्हल एपीके हे ॲप इन्स्टॉल करण्यास सांगून त्यावर वाघ यांच्या डेबीट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर भामट्याने वाघ यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून गंडा घातला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button