विरोधकांकडून राजकारणातून डायलॉगबाजी; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना प्रतिउत्तर | पुढारी

विरोधकांकडून राजकारणातून डायलॉगबाजी; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना प्रतिउत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रिम कोर्टाने मंत्रीमंडळ विस्तार करू नका, असे म्हटले नाही. महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल; पण विरोधकांना माहिती असताना देखील राजकारणाकरीता डायलॉगबाजी केली जात आहे, असे प्रत्‍युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिले.  दिल्ली येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या परिषदेपूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी  संवाद साधला.

ओबीसी समाजानेच मला घडवले

दिल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची परिषद संपन्न होत आहे. या परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार ओबीसी हिताचं सरकार आहे. मी मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी २२ विविध निर्णय घेतले. माझ्या मतदारसंघात सर्वाधिक ओबीसी समाज आहे. ओबीसी समाजानेच मला घडवले असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात सचिवांना मंत्र्यांचे अधिकार दिले आहेत. यावरून अजित पवार यांनी शिंदे व फडणवीस यांच्यावर टीका केली होती. याला प्रतिउत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व माहीती असताना देखील राजकारणाकरीता डायलॉगबाजी केली जात आहे. पण लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल.

काय म्हणाले होते अजित पवार?

पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज्यात सध्या एकट्याचेच मंत्रीमंडळ आहे. सचिवांना मंत्र्यांचे अधिकार दिले आहेत. हे काय चाललं आहे? जनता सगळं बघत असून सत्ता कधी उलथवून टाकेल ते तुम्हाला कळणार नाही;  मग तुमचा अधिकार पण चीफ सेक्रेटरीला देऊन टाका आणि घरी बसा, अशी टीका पवार यांनी केली होती.

हेही वाचा :

Back to top button