Nilesh Rane: “केसरकरांसाठी आमच्याकडे ड्रायव्हरची जागा” ; निलेश राणेंचे खोचक ट्विट | पुढारी

Nilesh Rane: "केसरकरांसाठी आमच्याकडे ड्रायव्हरची जागा" ; निलेश राणेंचे खोचक ट्विट

पुढारी ऑनलाईन: सध्याच्या शिंदे शिवसेना गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना भाजप युती होणार होती, पण राणेंना मंत्रीपद मिळाल्याने ही युती फिस्कटली असा गौप्यस्फोट केला. तसेच त्यांनी आमचे राणेंसोबत कोणतेही मतभेद नसून, मी त्याच्याबरोबर काम करायला तयार असल्याचे स्पष्ट केले. यावर निलेश राणेंनी केसरकरांना उद्देशून खोचक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये ” दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.” असा उल्लेख केला आहे.

दीपक केसरकर यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सुशांतसिंह रजपूत आत्महत्तेप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटूंबाची बदनामी महाराष्ट्रात सुरू होती. तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर उद्धवजीसुद्धा भाजपसोबत युती करायला तयार होते. पण राणेंना केद्रात मंत्रीपद दिल्यानंतर होणारी युती फिसकटली, असा गौप्यस्फोट केसरकरांनी केला यानंतर जाहीररीत्या काही न बोलता आमदार नितेश राणे यांनी याबाबत तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी केसरकरांवर टीकेची झोड उठविली. त्यानंतर आता आ. केसरकर नरमल्याचे चित्र दिसत आहे.

यानंतर शनिवारी पत्रकारांशी बोलताना, यापुढे मी जसे आपण शरद पवार यांच्याबद्दल बोलण्याचे थांबवले आहे. तसेच यापुढे राणे यांच्यावरही बोलणार नसल्याचे केसरकरांनी स्पष्ट केले. भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर केसरकर यांनी नरमाईची भूमिका घेतली असल्यामुळे त्यांचे प्रवक्‍तेपद कायम राहते की किरण पावसकर यांच्याकडे ते दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button