बीड : मुंगीच्या ढाकणे टोळीवर दरोड्याचा गुन्हा दाखल

file photo
file photo

गेवराई ; पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोरगाव परिसरात दहशत निर्माण करून दररोज हजारो ब्रास वाळूचा ढाकणे टोळीकडून उपसा केला जातो. यातून लाखों रूपयांचा मुद्देमाल चोरी करणारी मुंगी येथील ढाकणे टोळी अवैध वाळू तस्करीत सक्रीय आहे. (दि 24 मे) च्या रात्री बोरगाव परिसरात मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी रात्री उशीरा चकलांबा पोलिस स्‍टेशनमध्ये ढाकणे टोळीवर दरोड्यासह अन्य कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कंदूरीचा कार्यक्रम सुरू असतांना ढाकणे टोळीतील दोघांनी जेवण करत असलेल्या लोकांच्या अंगावर बूलेट घातली. तसेच त्या ठिकाणी आपल्या अन्य साथीदारांना फोनवरून बोलावून घेतले व सहा ते सात लोकांना जबर मारहाण केली. तसेच काहींच्या मोटार सायकलींवर पेट्रोल टाकून जाळून टाकल्‍याबाबत एकाने चकलांबा पोलिस स्‍टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्‍यावरून या प्रकरणी दरोड्यासह अन्य कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. ढाकणे टोळीतील अठरा लोकांचा या गुन्ह्यात सहभाग असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गढवे हे करत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news