मुंबई : कोस्टल रोडचे ५८ टक्के काम पूर्ण | पुढारी

मुंबई : कोस्टल रोडचे ५८ टक्के काम पूर्ण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडचे 58 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील 111 हेक्टरपैकी 107 हेक्टर म्हणजे 97 टक्के भरणी पूर्ण झाली आहे. तर, समुद्र किनाऱ्यालगतच्या भिंतीचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलांखाली बांधण्यात येणाऱ्या 175 एकल स्तंभ खांबापैकी 70 म्हणजे 40 टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे.

या प्रकल्पात प्रत्येकी 2070 किमी अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. त्यापैकी प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गाकडे (मरिन ड्राईव्ह) जाणारा बोगदा यापूर्वीच पूर्ण झाला आहे, तर दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचे 39 टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष मुंबई महापालिकेने ठेवले आहे.

हेही वाचा :  

Back to top button