Riteish Deshmukh : रितेश देशमुखने शेअर केला वडिलांचा व्हिडिओ; नेमकं काय आहे ‘या’ व्हिडिओत | पुढारी

Riteish Deshmukh : रितेश देशमुखने शेअर केला वडिलांचा व्हिडिओ; नेमकं काय आहे 'या' व्हिडिओत

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत सर्वाधिक १३ जागा जिंकत काँग्रेसने बहुमान मिळवला आहे. गेल्या काही महिन्यात शिवसेना, राष्ट्रवादी पक्षात फुट पडली, मात्र काँग्रेसने आपली एकजुट सोडली नाही. रितेश देशमुख भारत जोडो यात्रेत दिसला नाही, म्हणून त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र या टीकेला त्याने एका व्हिडोओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. लोकसभा निकालानंतर अभिनेता रितेश देशमुख याने आपले वडील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा काँग्रेसवरील एक जुना व्हिडिओ ‘एक्स’ वर पोस्ट केला. (Riteish Deshmukh)

नेमकं काय आहे ‘या’ व्हिडिओत

विलासरावांच्या काँग्रेसवरच्या भाषणावरचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये विलासराव देशमुख म्हणतात की, लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रुप काँग्रेसला प्राप्त झालंय.अनेकांनी प्रयत्न केलेत काँग्रेस संपवायचे ते संपले, काँग्रेस नाही संपली. हा इतका प्रचंड इतिहास आहे. या काँग्रेसला त्यागाचा , बलिदानाचा. देशाच्या स्वतंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे. काँग्रेसने नेहमी गरीबांचा विचार केला. आजही काँग्रेस म्हणते, काँग्रेसचा हाथ आम आदमी के साथ ही काँग्रेसची भुमिका आहे. महिलांचा सन्मान वाढवायचं काम काँग्रेसने केलं कालंपर्यंत महिलांना ३३% टक्के रिझरवेशन होतं आज ५० टक्के आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, कार्पोरेशन प्रत्येक ठिकाणी त्यांना मानाचं स्थान देण्याचं काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेस कामाच्या बळावर मते मागतेय, आश्वासनाच्या बळावर नाही. उजळ माथ्याने तुमच्यासमोर येऊन मते मागायचा अधिकार आमच्याकडे आहे. (Riteish Deshmukh)

हेही वाचा :

Back to top button