Sreesanth Eknath Sugar Factory Election: श्रीसंत एकनाथ साखर कारखाना निवडणूक : संत एकनाथ शेतकरी विकास पॅनेलची बाजी | पुढारी

Sreesanth Eknath Sugar Factory Election: श्रीसंत एकनाथ साखर कारखाना निवडणूक : संत एकनाथ शेतकरी विकास पॅनेलची बाजी

पैठण; पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखाना भाडेतत्त्वावर चालविणारे सी.ए सचिन घायाळ, चेअरमन तुषार सिसोदे यांच्या नेतृत्वाखालील संत एकनाथ शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली. या पॅनेलचे याआधी ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. Sreesanth Eknath Sugar Factory Election

आज (दि.१२) सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली. संत एकनाथ शेतकरी विकास पॅनलचे १५ उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांचे चिरंजीव विशाल वाघचौरे यांच्यासह ९ उमेदवाराचा पराभव झाला.
श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालक पदाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. यावेळी कारखाना भाडेतत्वावर चालविणारे सी.ए सचिन घायाळ, चेअरमन तुषार सिसोदे यांच्या पॅनलचे १५ उमेदवार दणदणीत विजय मिळविला. Sreesanth Eknath Sugar Factory Election

कावसान गट (क्र १) सी.ए सचिन घायाळ, एकनाथ नवले, आबासाहेब मोरे. विहामांडवा (गट क्र. २) प्रल्हाद औटे, भाऊसाहेब पिसे, दत्ता वाकडे, लोहगाव (गट क्र. ५) तुषार शिसोदे, अक्षय शिसोदे, कचरू बोबडे, सहकार पणन संस्था गटातून ताराबाई घायाळ, अनुसूचित जाती गटातून रमेश झिने महिला गटातून अनुराधा तुपकर, उशाबाई थोरात, ओबीसी गटातून शिवाजी जाधव, विमुक्त जातीतून बाबासाहेब खरात हे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.

यापूर्वी पाचोड गटातून विक्रम काका घायाळ, भारत घायाळ, गणेश घायाळ, बिडकीन गटातून दिगंबर तात्या गोर्डे, दीपक फंदाडे, दत्तात्रय आम्ले आदी ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर माजी आमदार संजय वाघचौरे पुरस्कृत कारखाना बचाव पॅनलचा निवडणुकीत सुफडा साफ झाला.

हेही वाचा 

Back to top button