छ.संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंपळदरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार | पुढारी

छ.संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंपळदरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार

पिंपळदरी; पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी घडली. आकाश रामदास पाडळे (वय 25, रा. रा पिंपळदरी वाडा शिवणा ) असे मृताचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, आकाश पाडळे पिंपळदरी वाडा शिवणा  येथील शेतीमध्ये गव्हाला पाणी देऊन पिंपळदरी वाडा येथे दुचाकीवरून परत येत होता. यावेळी पिंपळदरी येथील अजिंठा लेणी व्ह्यू पॉइंट रोडवर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

आकाश पाडळे हा जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमध्ये सिक्युरिटीमध्ये काम करत होता. अजिंठा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पुढील तपास प्रमोद भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले, भागवत शेळके करीत आहे.

हेही वाचा  

Back to top button